‘नाट्यपरिषद करंडक’ स्पर्धेचा सोलापुरात शुभारंभ
सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपत नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्यपरिषद करंडक २०२६’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मुळे सभ
‘नाट्यपरिषद करंडक’ स्पर्धेचा सोलापुरात शुभारंभ


सोलापूर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपत नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्यपरिषद करंडक २०२६’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला मुळे सभागृहात सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. बसवराज सलगर उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजयकुमार साळुंके, महानगर शाखेचे अध्यक्ष प्रा. अजय दासरी, बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, मंगळवेढा शाखेचे प्रमुख कार्यवाह यतिराज वाकळे, पंढरपूर शाखेचे दत्तात्रय जगताप, स्पर्धेचे केंद्रप्रमुख सुमीत फुलमामडी, आशुतोष नाटकर, नागेंद्र माणेकरी आणि सोलापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रा. जोतिबा काटे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, प्राथमिक फेरीत सोलापूर केंद्रावर सर्वाधिक एकांकिका सादर होणार आहेत, अशी माहिती विजयकुमार साळुंके यांनी प्रास्ताविकात दिली. स्थानिक कलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शहरातील समृद्ध नाट्यपरंपरा यामुळे सोलापूर केंद्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ॲड. बसवराज सलगर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या कलावंतांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रकाश यलगुलवार यांनी नाट्य परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि लेखक घडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande