लातूरच्या बोधेनगरात ४६० ग्रॅम गांजा जप्त
एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल लातूर, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर शहरातील बोधेनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ९ हजार २०० रुपये किमतीचा ४६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला अस
पोलीस कारवाई


एकाविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

लातूर, १३ ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर शहरातील बोधेनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ९ हजार २०० रुपये किमतीचा ४६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी कलप्पा रमू मुनोळी (वय ४१, रा. बोधेनगर, लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या बोधेनगर येथील राहत्या घरात हिरवट-पिवळसर रंगाचा, पाला, काड्या व बिया मिश्रित तसेच उग्र वास असलेला ४६० ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तो जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ९ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार संदेश समुखराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यातील (एनडीपीएस) कलम ८(क) आणि २०(ब) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande