पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रवासी रेल्वे रुळावरून घसरली; पाच जणांचा मृत्यू, ३० जखमी
इस्लामाबाद, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी येथे एक प्रवासी रेल्वेगाडी रुळावरून घसरली. या अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुस
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रवासी रेल्वे रुळावरून घसरली; पाच जणांचा मृत्यू, ३० जखमी


इस्लामाबाद, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी येथे एक प्रवासी रेल्वेगाडी रुळावरून घसरली. या अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ३० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीहून पेशावरला जाणाऱ्या ‘रहमान बाबा एक्स्प्रेस’ला पहाटे सुमारे ५ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला. मुलतानमधील शेरशाह पुलाजवळ ही रेल्वेगाडी रुळावरून घसरली.पोलीस आणि बचाव पथकातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जखमींना उपचारांसाठी मुलतान येथील निश्तर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे. पोलिसांनी या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची आणि सुमारे ३० जण जखमी झाल्याची माहिती दिली.बचाव पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेगाडीचे १३ डबे रिकामे करण्यात आले असून, एका डब्यात बचावकार्य सुरू होते.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वतंत्र निवेदनांद्वारे या दुर्घटनेतील मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच, बचावकार्याला गती देण्याचे आणि जखमींना शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. बचावकार्य पुढे सरकत असताना पाकिस्तान रेल्वे आणि संबंधित अधिकारी अधिक माहिती देतील, अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानची रेल्वे व्यवस्था जुन्या पायाभूत सुविधांमुळे आणि देखभालीशी संबंधित समस्यांमुळे अनेक वर्षांपासून आव्हानांचा सामना करत आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये सिंध प्रांतातील नवाबशाहजवळ हजारा एक्स्प्रेस रुळावरून घसरली होती. या दुर्घटनेत किमान ३० जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे पाकिस्तानमधील रेल्वे सुरक्षा आणि देखभालीबाबतच्या चिंता पुन्हा अधोरेखित झाल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande