नाशकात दांडियाच्या रंगांतील सामाजिक बांधिलकीचा मेळ
क्रांती रेडकर, सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार नाशिक, 13 ऑक्टोबर, (हिं.स.)। नाशिक इव्हेंट अँड डेकोर असोसिएशनने (NEDA) नवरात्रीच्या सणात दांडियाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ घालण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. असोसिएशनने आयोजित केलेल्या ''म
Social commitment in the


क्रांती रेडकर, सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार

नाशिक, 13 ऑक्टोबर, (हिं.स.)। नाशिक इव्हेंट अँड डेकोर असोसिएशनने (NEDA) नवरात्रीच्या सणात दांडियाचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी यांचा मेळ घालण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. असोसिएशनने आयोजित केलेल्या 'मयूर अलंकार प्रसाद नेडाचा रास रंग २.०' या तीन दिवसीय दांडिया महोत्सवाचा एक भाग म्हणून, प्रबोधिनी विद्या मंदिरातील पाच विशेष गरजा असलेल्या मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान हॉटेल पाम स्प्रिंग रिसॉर्ट येथे होणाऱ्या या महोत्सवात पंचवीसपेक्षा जास्त इव्हेंट आयोजक सहभागी होणार आहेत.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री क्रांती रेडकर आगामी मराठी चित्रपट 'मैत्री'च्या कलाकारांसोबत उपस्थित राहणार असून, १७ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहे. दांडिया नृत्य, विविध खेळ, एक विशेष फोटोग्राफी हॉल आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही या महोत्सवाची मुख्य आकर्षणे असतील. दांडिया गट स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. इव्हेंट व्यावसायिकांना व्यावसायिक नेटवर्किंगच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील.

NEDA चे अध्यक्ष प्रवीण कामले यांनी सांगितले की, शहरातील इव्हेंट व्यावसायिकांना एकत्र आणणे आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सचिव तुषार श्रीवास्तव यांनी मनोरंजनाचा आनंद घेताना सामाजिक कार्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष रुपेश गुप्ता आणि कुणाल जग्गी यांनी व्यावसायिक सहकार्याच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला. खजिनदार सरफराज सय्यद यांनी शहरवासीयांना आगाऊ तिकीट बुक करण्याचे आवाहन केले. BookMyShow वेबसाइटवर तिकिटे उपलब्ध आहेत.

: सामाजिक बांधिलकीचा वी अडॉप्ट उपक्रम

NEDA च्या वी अडॉप्ट उपक्रमांतर्गत, प्रबोधिनी विद्या मंदिरातील पाच विशेष गरजा असलेल्या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रायोजक, सहयोगी आणि इव्हेंट व्यावसायिकांच्या सहभागातून योगदान दिले जाईल. मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता जपण्याचा हा प्रयत्न महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande