आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या रेनशॉ आणि हेझलवूडची मोठी झेप
दुबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू रेनशॉ आणि जोश हेझलवूड यांनी आयसीसीच्या पुरुषांच्या कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत मोठी झेप घेतल ीआहे. तर भारताच्या श्रेयस अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय फल
मॅट रेनशॉ


दुबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.)डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू रेनशॉ आणि जोश हेझलवूड यांनी आयसीसीच्या पुरुषांच्या कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत मोठी झेप घेतल ीआहे. तर भारताच्या श्रेयस अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा चौथ्या स्थानावर मजल मारली आहे.

रेनशॉने डर्बन कसोटीच्या पहिल्या डावात १९० आणि दुसऱ्या डावात ८२ धावा केल्या. या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यावर वर्चस्व मिळवता आले आणि या डावखुऱ्या फलंदाजाची कसोटी फलंदाजी क्रमवारीत १०० च्या बाहेरून थेट संयुक्त ४९ व्या स्थानावर मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबुशेननेही चार स्थानांची सुधारणा करत ३४ वे स्थान गाठले, तर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्करम चार स्थानांच्या प्रगतीसह संयुक्त १० व्या स्थानावर पोहोचला.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी ६ बळी ४९ धावा (६/४९) अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड कसोटी गोलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांच्या सुधारणेसह सातव्या स्थानावर पोहोचला. त्याचा सहकारी मिचेल स्टार्क कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. तीन वर्षांहून अधिक काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्कियाने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत ३४ व्या स्थानावर स्थान मिळवले आहे.

भारताचा रवींद्र जडेजा कसोटी अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विआन मुल्डरने एका स्थानाची सुधारणा करत चौथे स्थान गाठले, तर सायमन हार्मर पाच स्थानांच्या प्रगतीसह संयुक्त २३ व्या स्थानावर पोहोचला.

आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या क्रमवारीतही बदल दिसून आले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मायदेशातील मालिकेत दमदार सुरुवात केल्यामुळे भारताच्या श्रेयस अय्यरने फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा चौथ्या स्थानावर मजल मारली आहे.

लखनऊ येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अय्यरने त्याचे पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आणि क्रमवारीत तीन स्थानांची प्रगती केली. त्याच्या या प्रगतीमुळे आता टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल चार क्रिकेटपटूंमध्ये भारताचे तीन क्रिकेटपटू आहेत. यात ईशान किशन पहिल्या आणि अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीनंतर कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवल्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार साहिबजादा फरहान तिसऱ्या स्थानावर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande