
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर (हिं.स.)आयपीएलमधील क्रिेकेटपटूंच्या अदलाबदलीनुसार, टी. नटराजन सनरायझर्स हैदराबादमध्ये परतला आहे, तर लेग-स्पिनर झीशान अन्सारी दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. सनरायझर्सने नटराजनला ५ कोटी रुपयांच्या सुधारित शुल्कावर करारबद्ध केले आहे. अन्सारी त्याच्या सध्याच्या ४० लाख रुपयांच्या शुल्कावर दिल्ली कॅपिटल्ससोबतच राहील. आयपीएलने दोन्ही क्रिकेटपटूंच्या या अदलाबदलीची घोषणा केली.
नटराजन हा सनरायझर्स हैदराबादच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने आयपीएल २०२४ मध्ये १९ बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो त्या हंगामात हैदराबादचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नटराजनने आतापर्यंत ७३ आयपीएल सामने खेळून ७२ बळी घेतले आहेत. लीगमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी १९ धावांत ४ बळी ही आहे. त्याने भारतीय संघासाठी एक कसोटी आणि दोन एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.
झीशान अन्सारी आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तो ४० लाख रुपयांच्या सध्याच्या शुल्कावर संघात सामील झाला आहे. अन्सारीने आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून १० सामने खेळले होते. अन्सारीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात तीन बळी घेत आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने १० आयपीएल सामन्यांमध्ये सहा बळी घेतले आहेत. दिल्ली कॅपिटल्सला आशा आहे की त्याच्या आगमनामुळे त्यांचा फिरकी गोलंदाजी विभाग आणखी मजबूत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे