
मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। चायनीज वोकने नवीन व्हॅल्यू प्लॅटफॉर्मच्या लाँचसह दैनंदिन जेवणाचा आस्वाद घेण्याच्या क्षणांमध्ये अधिक उत्साहाची भर केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फक्त ९९ रुपये इतक्या परवडणाऱ्या दरात ग्राहकांसाठी पोटभर आणि चवदार देसी-चायनीज जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दररोज लहान ट्रीटचा आनंद घेतला पाहिजे या विचारावर आधारित हा व्हॅल्यू प्लॅटफॉर्म तरुण व्यावसायिक, नोकरदार आणि शहरातील ग्राहकांच्या दैनंदिन जेवणाच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे, ज्यांना एखाद्या खास प्रसंगासारखा मोठा खर्च न करता झटपट आणि समाधानकारक जेवण पाहिजे.
हवास क्रिएटिव्ह इंडियासोबत सहयोगाने संकल्पना मांडण्यात आलेली आणि प्रत्यक्षात आणलेली ही नवीन मोहीम कामकाजाच्या दिवसांमधील नेहमीच्या लंचमधील क्षणाला सादर करते, तसेच फक्त ९९ रुपयांत व्हेज हक्का नूडल्स किंवा व्हेज चाऊमीन उपलब्ध करून देत व्हॅल्यू प्लॅटफॉर्मला प्रकाशझोतात आणते.
ही जाहिरात ताज्या, वोक-फायर्ड नूडल्ससह जेवणाचा अद्वितीय अनुभव देते. तसेच या जाहिरातीमध्ये टेबलावर येणारे व्हॅल्यू वोक बॉक्सेस आणि पहिल्याच घासात मिळणारे त्वरित समाधान दाखवले आहे. या मोहिमेचा शेवट नवीन नेमोनिक चायनीज वोक्स वोकडे ट्रीटसह होतो. ही रोजच्या कामकाजाच्या दिवसातील ट्रीटला दिलेले उत्साहवर्धक ट्विस्ट आहे, जे सर्वसामान्य कामकाजाच्या दिवसाचे रूपांतर फक्त ९९ रुपयांत स्वादिष्ट आणि समाधानकारक देसी-चायनीज जेवणाचा आस्वाद घेण्याच्या संधीमध्ये करते.
या मोहिमेबद्दल मत व्यक्त करत लेनेक्सिस फूडवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अरविंद आर. पी. म्हणाले, “देसी चायनीज भारतातील व्यक्तींचे आवडते कम्फर्ट फूड आहे: पोटभर, चवीने परिपूर्ण आणि प्रत्येकाच्या अगदी ओळखीचे. नवीन ९९ रुपये व्हॅल्यू प्लॅटफॉर्मच्या लाँचसह आम्ही आमचे हक्का नूडल्स आणि चाऊमीनसारखे लोकप्रिय खाद्यपदार्थ प्रत्येकासाठी परवडणारे करत आहोत, तसेच भारतातील अधिकाधिक व्यक्तींना केवळ घरीच नव्हे तर चायनीज वोकच्या आउटलेट्समध्ये येऊन जेवणाचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करत आहोत. हवास क्रिएटिव्ह इंडियाने प्रत्यक्षात आणलेला हा नवीन व्हॅल्यू प्लॅटफॉर्म आम्ही देशभरात विस्तार करत असताना चायनीज वोकला खऱ्या अर्थाने ओम्नी-चॅनेल ब्रँड बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.”
या मोहिमेमागील सर्जनशील दृष्टिकोनाबाबत मत व्यक्त करत हवास क्रिएटिव्ह इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर अनुपमा रामास्वामी म्हणाल्या, “आम्हाला ग्राहकांशी संबंधित अत्यंत साधे वास्तव समोर आणायचे होते, ते म्हणजे कामकाजाचे दिवस अनेकदा कंटाळवाणे व व्यावहारिक वाटू शकतात आणि व्यक्ती काहीशा विरंगुळ्यासाठी लंच ब्रेकची वाट पाहत असतात. आम्हाला याच भावनेला चायनीज वोकच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीमध्ये रूपांतरित करायचे होते. ९९ रुपयांत मिळणारा व्हॅल्यू वोक ग्राहकांना कोणत्याही खास प्रसंगाची गरज नसताना ट्रीटसारखा वाटणारा जेवणाचा अनुभव देतो. ‘चायनीज वोक्स वोकडे ट्रीट’ हा विचार अगदी सोप्या, संस्मरणीय आणि ठळकपणे चायनीज वोकच्या शैलीत मांडते.”
चायनीज वोकचे व्हॅल्यू वोक्स आता सहभागी चायनीज वोक रेस्टॉरंट्समध्ये ९९ रुपयांत उपलब्ध आहेत, ज्यामध्ये निवडक भागांमध्ये हक्का नूडल्स आणि इतर भागांमध्ये चाऊमीन दिले जात आहे. ही मोहीम मॉल्स, फूड कोर्ट्स आणि प्रमुख हाय-स्ट्रीट परिसरांमध्ये आऊटडोअर संवादाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचवली जात आहे. उपलब्धतेच्या अधीन राहून ग्राहक डाईन-इन आणि टेकअवेद्वारे या व्हॅल्यू वोक्सचा आस्वाद घेऊ शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर