केंद्र सरकारकडून पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ, डिझेलवरील करात कपात
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारने १६ ऑक्टोबर (शुक्रवार) पासून सुरू होणाऱ्या पंधरवड्यासाठी निर्यात केल्या जाणाऱ्या पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. दुसरीकडे, डिझेलच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करण्यात आली आहे
Govt increased windfall tax on petrol exports toda


नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारने १६ ऑक्टोबर (शुक्रवार) पासून सुरू होणाऱ्या पंधरवड्यासाठी निर्यात केल्या जाणाऱ्या पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ केली आहे. दुसरीकडे, डिझेलच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या करात कपात करण्यात आली आहे. विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील शुल्क १०.५ रुपये प्रतिलिटर कायम ठेवण्यात आले आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पंधरवड्यासाठी डिझेलच्या निर्यातीवरील अप्रत्याशित लाभ कर कमी करण्यात आला आहे, तर पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क वाढवण्यात आले आहे. विमान इंधन अर्थात एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या निर्यातीवरील शुल्क १०.५ रुपये प्रतिलिटर कायम ठेवण्यात आले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, शुल्कातील हे बदल १६ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.

अधिसूचनेनुसार, डिझेलच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (एसएईडी) आणि रस्ते व पायाभूत सुविधा उपकर मिळून आता एकूण ८.५ रुपये प्रतिलिटर शुल्क आकारले जाईल. यापूर्वी हे शुल्क १६ रुपये प्रतिलिटर होते. त्याचप्रमाणे, पुढील पंधरवड्यासाठी पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क ०.५ रुपये प्रतिलिटरवरून वाढवून २.५ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे.

वित्त मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, शुल्कातील हे बदल १६ ऑक्टोबरपासून लागू होतील. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २७ मार्च रोजी डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर शुल्क लागू केले होते. त्यानंतर दर पंधरवड्याला या शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली जात आहे. तर १६ मेपासून पेट्रोलच्या निर्यातीवरही हे शुल्क लागू करण्यात आले होते. देशांतर्गत वापरासाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या शुल्कदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी अप्रत्याशित लाभ कर अर्थात विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला होता. निर्यातदारांना अवाजवी नफा कमावण्यापासून रोखणे, हाही या करामागील उद्देश होता. युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. तसेच, पश्चिम आशियातील संकटाच्या काळात इंधनाच्या निर्यातीला आळा घालून पेट्रोलियम उत्पादनांची देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करणे, हा देखील या कराचा उद्देश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande