शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी वधारला
निफ्टी २३,१०० च्या पार; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८२,५६० कोटींची वाढ नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी तसेच घसरणीच्या स्तरावर झालेल्या मूल्याधारित खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रव
Stock market closed


निफ्टी २३,१०० च्या पार; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८२,५६० कोटींची वाढ

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी तसेच घसरणीच्या स्तरावर झालेल्या मूल्याधारित खरेदीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी तेजी परतली. आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सुरुवातीला विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने दोन्ही निर्देशांक घसरले होते. मात्र, त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने बाजाराने जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्स ४१३.६६ अंकांनी, तर निफ्टी १४८.८० अंकांनी वधारला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ८२,५६० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५.४७ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७४,३४१.०८ अंकांवर उघडला. मात्र, व्यवहार सुरू झाल्यानंतर नफावसुलीमुळे निर्देशांक घसरून ७४,०१२.९९ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर आयटी आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराने वेगाने सावरत दिवसाच्या नीचांकी स्तरावरून ७६५ अंकांहून अधिक झेप घेतली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ७४,७७८.७८ अंकांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. अखेर ४१३.६६ अंक अर्थात ०.५६ टक्क्यांच्या वाढीसह ७४,७२९.२७ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६७.७५ अंकांच्या वाढीसह २३,०६५.१० अंकांवर उघडला होता. मात्र, सुरुवातीच्या विक्रीमुळे तो घसरून २२,९१३.८० अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर झालेल्या जोरदार खरेदीमुळे निफ्टीने नीचांकी स्तरावरून २३६ अंकांहून अधिक उसळी घेतली. दिवसाच्या व्यवहारात तो २३,१४९.८५ अंकांपर्यंत पोहोचला. अखेर १४८.८० अंक अर्थात ०.६५ टक्क्यांच्या वाढीसह २३,१४६.१५ अंकांवर बंद झाला. जवळपास तीन आठवड्यांनंतर निफ्टी पुन्हा २३,१०० अंकांच्या वर बंद होण्यात यशस्वी झाला.

क्षेत्रनिहाय व्यवहारात आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक उत्साह दिसून आला. निफ्टी आयटी निर्देशांक ३.९२ टक्क्यांनी वधारला. धातू क्षेत्रातील शेअर्समध्येही खरेदी झाल्याने निफ्टी मेटल निर्देशांक जवळपास एक टक्क्याने वाढला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ०.६७ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला. दुसरीकडे, एफएमसीजी निर्देशांक ०.३९ टक्के आणि औषधनिर्मिती क्षेत्राचा निर्देशांक ०.१४ टक्क्यांनी घसरला. मिडकॅप निर्देशांक ०.११ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.०१ टक्क्यांनी खाली आला.

दिवसाच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य वाढून ४,७२,६६,१२२.०४ कोटी रुपयांवर पोहोचले. गुरुवारी हे मूल्य ४,७१,८३,५६१.४६ कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात ८२,५६०.५७ कोटी रुपयांची भर पडली.

सेन्सेक्समधील प्रमुख वाढणाऱ्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा ८.४८ टक्के, टीसीएस ४.८९ टक्के आणि इन्फोसिस ४.६१ टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली. दुसरीकडे, इंडिगो १.९१ टक्के, बीएसई लिमिटेड १.९० टक्के आणि मॅक्स हेल्थकेअर १.४० टक्क्यांनी घसरले. एकूणच, आयटी आणि बँकिंग शेअर्समधील खरेदीमुळे आठवड्याच्या अखेरीस बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande