
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात किरकोळ तेजी दिसून येत आहे. दरांमध्ये झालेल्या बदलानंतर सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅममागे २१० ते २३० रुपयांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही आज सुरुवातीच्या व्यवहारात प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंतची सांकेतिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
किमतींमध्ये झालेल्या वाढीनंतर देशातील बहुतांश सराफा बाजारांत आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,६६० ते १,४७,८१० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोने १,३५,३५० ते १,३५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान विकले जात आहे. चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीचा भाव २,३०,००० रुपये प्रतिकिलो या स्तरावर आहे.
साप्ताहिक आधारावर पाहिले असता, आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतीत कमजोरी नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातील व्यवहारात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे ३,७६० रुपयांपर्यंत घसरला. त्याचप्रमाणे, २२ कॅरेट सोन्याचा दर साप्ताहिक आधारावर प्रति १० ग्रॅममागे ३,४५० रुपयांपर्यंत कमी झाला. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात सातत्याने घसरण झाली. आज किरकोळ वाढ नोंदवली गेली असली, तरी साप्ताहिक आधारावर चांदीचा दर प्रतिकिलो १०,००० रुपयांपर्यंत घसरला आहे.
दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,८१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,५०० रुपये नोंदवण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने १,४७,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,३५,३५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे, अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ दर १,४७,७१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,४०० रुपये नोंदवण्यात आला आहे.
या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने १,४७,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,३५,३५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. कोलकातामध्येही २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,३५० रुपये आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १,४७,७१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १,३५,४०० रुपये आहे.
जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने १,४७,८१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,३५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. पाटणा येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,७१० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३५,४०० रुपये आहे. लखनौच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने १,४७,८१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने १,३५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या सराफा बाजारांतही आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढीचा कल कायम आहे. या तीन राज्यांच्या राजधानी असलेल्या बेंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १,४७,६६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे, या तिन्ही शहरांतील सराफा बाजारांत २२ कॅरेट सोने १,३५,३५० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule