
येवला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
:- येवले शहरात शनिवारी सायंकाळी आठच्या दरम्यान येवले शहरातील उड्डाणपूल परिसरात भाजीपाला बाजारात ५०० रुपयांच्या बनावट (फेक) नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयीत आरोपीच्या येवला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हे तिघे आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे कळते.
भाजी विक्रेत्यांनी दाखवलेली प्रसंगावधान आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे हे रॅकेट उघडकीस आले. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे तीन संशयित खाऊ गल्लीतील भाजी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी प्रत्येक वेळी ५०० रुपयांची नोट देत असल्याने भाजी विक्रेत्यांना संशय निर्माण झाला. भाजी विक्रेत्यांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देताच पोलीस घटना स्थळी हजर होऊन सं शयीतांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 500 रुपयाच्या 64 बनावट नोटा व चालनात बदललेले 27 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश पाटोळे, अरविंद रायभोळे, अजित जगधने व होमगार्ड सुनील आढांगळे आदींनी केली. आता येवला पोलीस पुढील तपास करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI