कर्जतमध्ये घरफोड्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, अडीच लाखांचा ऐवज हस्तगत
रायगड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्म हाऊस आणि घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Burglary cases solved in Karjat; two accused arrested, valuables worth 2.5 lakh rupees recovered


Burglary cases solved in Karjat; two accused arrested, valuables worth 2.5 lakh rupees recovered


रायगड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्म हाऊस आणि घरफोडीच्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सप्टेंबर २०२६ मध्ये दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३६७ आणि ३६८/२०२६ या सहा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सुबवे येथील तुषार चवळे आणि राहुल पेमारे यांना ताब्यात घेतले. त्यांनी संगनमताने कशेळे परिसरातील फार्म हाऊस, घरे तसेच बांधकामासाठी ठेवलेल्या साहित्याची चोरी केल्याचा आरोप आहे.

या कारवाईत बोअरिंगची मोटार, वॉशिंग मशीन, ३२ इंची टीव्ही, चार बॅटरी, चार इन्व्हर्टर, मोटारसायकल आणि १८ जीआय लोखंडी पाइप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कशेळे दूरक्षेत्रातील हवालदार लालासाहेब तोरवे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, तसेच केशव नागरगोजे, समीर भोईर, स्वप्निल येरुनकर, सतीश पाटील, योगेश गर्जे, ऋतिक गोऱ्हाणे आणि घुले यांनी तपासात सहभाग घेतला. या कारवाईमुळे कर्जत परिसरातील सहा चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande