मुख्यमंत्र्यांची 'पांडू हवलदार'शी तुलना करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी महायुतीच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब केले - भाजपा शिक्षक आघाडी
अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची तुलना पांडू हवालदार यांच्याशी केली. पांडू हवालदार हे चित्रपटात इमानदार असल्याचे सिद्ध झाले होते, त्यामुळे महायुती सरकार हे स्वच्छ, इमानदार आणि
मुख्यमंत्र्यांची 'पांडू हवलदार'शी तुलना करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी महायुतीच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब केले - भाजपा शिक्षक आघाडी


अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची तुलना पांडू हवालदार यांच्याशी केली. पांडू हवालदार हे चित्रपटात इमानदार असल्याचे सिद्ध झाले होते, त्यामुळे महायुती सरकार हे स्वच्छ, इमानदार आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे सरकार असल्याची पावतीच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिली आहे.

काँग्रेस आणि त्यांचे सहकारी कसे भ्रष्टाचारी आहेत, याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली आहे, अशी टीका भाजपा शिक्षक आघाडीचे प्रमुख केशव मेतकर, विजय थोटांगे आणि मनीष गावंडे यांनी केली.

सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे उत्तम रीतीने काम करीत आहेत. काँग्रेसकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते खोटी आश्वासने देत आहेत, जी आश्वासने ते पूर्ण करूच शकत नाहीत, अशी आश्वासने काँग्रेसचे सर्व नेते, उमेदवार सहज देत आहेत. त्यापासून मतदार, विशेषतः शिक्षक मतदार सजग आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

केवळ भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २४ तास काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना दिसत असतो. धनाजी-संताजी सारखा त्यांना भास होत असतो, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वागणुकीवर आणि बोलण्यावर ते सातत्याने दिसत असते, असे माधव मानकर यांनी सांगितले.

महायुतीचा विजय होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक प्रचंड बहुमताने विजयी होणारच असून शिक्षकांचा विश्वास महायुतीवर असल्याचे अंबादास उमाळे यांनी जनसंपर्क अभियानात सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande