आध्यात्मिक सेवाकार्यातून समाजाला दिशा देणाऱ्या संतोष दीदीजी, वासंती दीदीजींचा गौरव
नाशिकसह देशभरातील साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, नाशिक यांच्या वतीने राजयोगिनी बी. के. संतोष दीदीजी व राजयोगिनी बी. के. वासंती दीदीजी यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्
Glory to Santosh Didiji and


नाशिकसह देशभरातील साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

: प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, नाशिक यांच्या वतीने राजयोगिनी बी. के. संतोष दीदीजी व राजयोगिनी बी. के. वासंती दीदीजी यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त विशेष सत्कार समारंभ येथे झाला. आध्यात्मिक, सामाजिक व सेवाभावी कार्याचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यास साधू-संत, सामाजिक कार्यकर्ते, नाशिकसह महाराष्ट्र व देशभरातील सेवा केंद्रांतील साधक, भगिनी, मान्यवर व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय आखाडा परिषद प्रवक्ता महंत भक्ती चरण दास महाराज यांनी अष्टमीच्या मुहूर्तावर दोन्ही दीदीजींचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा होत असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. दीदीजींनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्याच्या छायेखाली समाज वावरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांनी राजयोगिनी बी. के. वासंती दीदीजी यांच्या नाशिकमधील सामाजिक, आध्यात्मिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी राजयोगिनी ब्रह्माकुमारी संतोष दीदीजी व नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्यांच्या निःस्वार्थ सेवेतून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असल्याचे सांगून संस्थेच्या मानवकल्याणाच्या कार्याला सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. माउंट आबू येथे जाणाऱ्या साधकांसाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकातून रेल्वेचे दोन डबे उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande