
नाशिक, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
- शहरातील रामकुंड परिसरामध्ये कुंभमेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाच्या पितळी धातूंची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शहरातील सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकमध्ये होत असलेल्या संयुक्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी वरती शहरातील धार्मिक स्थळ असलेल्या रामकुंड या ठिकाणी 51 बाय 31 फूट उंचीचे दोन ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहे या ध्वजास्तंभाला धार्मिक महत्त्व आहे त्याच्यावरती आकर्षक असे नक्षीकाम करण्यात आले आहे तो सजवण्यासाठी पितळी धातूचे नक्षीकाम करण्यात आलेले होते आणि या ध्वजास्तंबावरती 31 ऑक्टोबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म या ध्वजारोहण करणार आहेत.
पण यापूर्वीच रामकुंड परिसरात असलेल्या चोरट्यांनी आपले दिवाळी साजरी केली असून झाकून ठेवलेल्या या स्तंभावरती असलेले पितळी धातूचे साहित्य चोरून नेल्याची घटना समोर आली आहे ठेकेदाराने हे काम शनिवारी पूर्ण केलेले होते त्यानंतर रविवारी ही सर्व घटना घडल्याचे समोर आले असून याबाबतची अधिकृत तक्रार ही पंचवटी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI