केवळ गप्पांचा बाजार करणाऱ्यांपासून सावध राहा - आमदार रणधीर सावरकर
अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। शिक्षक हा समाजाचा आत्मा आहे. शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांवर लावण्याचे महापाप काँग्रेसने केले आहे. जी आश्वासने पूर्ण करू शकत नाहीत, अशा उमेदवारांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. केंद्रा
Photo


अकोला, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

शिक्षक हा समाजाचा आत्मा आहे. शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांवर लावण्याचे महापाप काँग्रेसने केले आहे. जी आश्वासने पूर्ण करू शकत नाहीत, अशा उमेदवारांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

केंद्रात आणि राज्यात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आहे. शिक्षकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्याची ताकद महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्यामध्ये असून त्यांच्या नावापुढे असलेल्या अनुक्रमांक ३ समोर १ क्रमांक लिहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

जे सातत्याने कर्मचाऱ्यांविषयी अपशब्द वापरतात, टीका करतात, लिहितात तेच आज शिक्षकांच्या पाया पडत आहेत, ते केवळ सत्तेसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रवृत्ती लक्षात घेऊन २६ उमेदवारांपैकी सक्षम उमेदवार महायुतीचे किरण सरनाईक असल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन विजय अग्रवाल यांनी केले.

केवळ द्वेषबुद्धीने काम करणारे वेगवेगळे मुखवटे घेऊन निवडणूक रिंगणात उभे आहेत. विकासाचा आणि प्रभावीपणे महाराष्ट्राचा विकास करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी केला आहे. त्यांचे शिलेदार म्हणून किरण सरनाईक यांना विजयी करा, असे आवाहनही विजय अग्रवाल यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande