आशियाई पॅरा गेम्स: निशाद कुमारला पुरुषांच्या टी-४७ लांब उडीत सुवर्णपदक
नागोया (जपान), १९ ऑक्टोबर (हिं.स.) भारताचा स्टार पॅरा-ॲथलीट आणि दोन वेळचा पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता निशाद कुमारने आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये पुरुषांच्या टी-४७ लांब उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली. हिमाचल प्रदेशातील हमीरपूरच
निशाद कुमार


नागोया (जपान), १९ ऑक्टोबर (हिं.स.) भारताचा स्टार पॅरा-ॲथलीट आणि दोन वेळचा पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता निशाद कुमारने आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये पुरुषांच्या टी-४७ लांब उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली.

हिमाचल प्रदेशातील हमीरपूरचा रहिवासी असलेल्या निशादने अंतिम फेरीत ७.११ मीटरची सर्वोत्तम उडी मारली, जी कामगिरी त्याने दोनदा केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळाले.

निशादने ६.९५ मीटरच्या उडीने स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ७.०९ मीटरची उडी मारून आघाडी घेतली. त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ७.११ मीटरपर्यंत आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली. चौथ्या प्रयत्नात त्याची उडी फाऊल ठरली, परंतु त्याने दबावाखाली उल्लेखनीय पुनरागमन केले.

भारतीय खेळाडूने पुन्हा एकदा आपल्या पाचव्या प्रयत्नात ७.११ मीटर आणि त्यानंतर सहाव्या व अंतिम प्रयत्नात ७.०७ मीटरची उडी मारली. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला सुवर्णपदक मिळाले.

लांब उडी हा निशादचा मुख्य खेळ नसतानाही, त्याने आपल्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. त्याची ही कामगिरी भारतीय पथकासाठी एक महत्त्वपूर्ण यश आहे.

उझबेकिस्तानच्या ओमादबेक खासानोव्हने ६.९९ मीटरच्या उडीसह रौप्यपदक जिंकले, जी या हंगामातील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या मोहम्मदू सफ्रानने ६.५५ मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande