प्रज्ञान ओझाकडे भारतीय संघ निवडीची जबाबदारी, रमेश पवार यांनाही समितीत स्थान
मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत फेरबदल करत, माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते अजित आगरकर यांची जागा घेतील. आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक कस
प्रज्ञान ओझा


रमेश पोवार


मुंबई, 19 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत फेरबदल करत, माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते अजित आगरकर यांची जागा घेतील. आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक कसोटी सामने खेळल्यामुळे, त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर ओझा यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.यासोबतच माजी क्रिकेटपटू रमेश पवार यांचाही निवड समितीत नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने माजी भारतीय क्रिकेटपटू रमेश पोवार यांची पुरुष निवड समितीमध्ये नियुक्ती करण्यासाठी एकमताने शिफारस केली. खेळलेल्या कसोटी सामन्यांच्या संख्येवर आधारित ज्येष्ठतेनुसार, प्रज्ञान ओझा पुरुष निवड समितीचे अध्यक्ष असतील. या पाच सदस्यीय समितीमध्ये शिव सुंदर दास, आर. पी. सिंग, अजय रात्रा आणि रमेश पोवार यांचा समावेश असून, ही समिती भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवडीसाठी जबाबदार असेल.

भारतासाठी दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेले रमेश पोवार यांच्याकडे प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी भारतीय महिला संघ, मुंबई, गुजरात आणि बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने आशिया कपचे विजेतेपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.

बीसीसीआयने पुरुष निवड समितीचे माजी अध्यक्ष अजित आगरकर यांच्या योगदानाचीही दखल घेतली. जुलै २०२३ पासून त्यांनी या पदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया कप विजेतेपदे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके जिंकली आहेत.

बीसीसीआयने म्हटले आहे, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने पुरुष निवड समितीच्या सदस्याच्या नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबवली. बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या बैठकीत सीएसीने अर्जदारांची छाननी केली आणि मुलाखती घेतल्या. या प्रक्रियेनंतर, समितीने एकमताने रमेश पोवार यांच्या नियुक्तीची शिफारस केली. आणि पुढे म्हटले आहे, पोवार यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी २ कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यानंतर त्यांनी भारतीय महिला संघ, मुंबई आणि गुजरातचे मुख्य प्रशिक्षक तसेच बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. भारतीय महिला संघासोबत काम करताना, त्यांनी संघाला आशिया कपचे विजेतेपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. “बीसीसीआय, पुरुष निवड समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात दाखवलेली वचनबद्धता, दृढनिश्चय आणि दिलेल्या योगदानाबद्दल अजित आगरकर यांचे आभार मानते.

जुलै २०२३ मध्ये नियुक्ती झाल्यापासून, आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटसाठी एका महत्त्वपूर्ण कालखंडात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी, दोन आशिया कप विजेतेपदे आणि आशियाई खेळांमध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. ज्येष्ठतेनुसार (सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले क्रिकेटपटू), प्रज्ञान ओझा या समितीचे अध्यक्ष असतील. पुरुष निवड समिती: प्रज्ञान ओझा (अध्यक्ष), शिव सुंदर दास, आर. पी. सिंग, अजय रात्रा, रमेश पोवार यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande