देवीच्या शक्तीपीठ मंदिरात होम हवन, मुंडे भगिनी भक्ती रंगात रमल्या
बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुर्गाष्टमीच्या दिवशी गोपीनाथ गडावरील देवीच्या शक्तीपीठ मंदिरात मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी होमहवन केले.यावेळी दोन्ही भगिनी भक्ती रंगात रमून गेल्या होत्या. को
नवरात्र उत्सव


बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुर्गाष्टमीच्या दिवशी गोपीनाथ गडावरील देवीच्या शक्तीपीठ मंदिरात मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डाॅ.प्रितम मुंडे यांनी होमहवन केले.यावेळी दोन्ही भगिनी भक्ती रंगात रमून गेल्या होत्या.

कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि माहूरची रेणुकामाता या तीनही देवीचे शक्तीपीठ मंदिर गोपीनाथ गडावर आहे, दरवर्षी नवरात्रात याठिकाणी उत्सव साजरा केला जातो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त याठिकाणी दर्शनाला येत असतात. आज दुर्गाष्टमीचे औचित्य साधून मुंडे भगिनींच्या हस्ते सकाळी मंदिरात होम हवन, आरती व विधीवत पूजा करण्यात आली, यावेळी परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता. आरतीच्या वेळी पंकजाताई झांज वाजवत तल्लीन झाल्या होत्या. यावेळी उपस्थित भाविकांना उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande