जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची माविमच्या जिल्ह्यातील उपक्रमांना भेट
अकोला, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील महिला बचत गट व महिला उद्योजकांनी उत्पादि
Photo


अकोला, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।

महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील महिला बचत गट व महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री स्टॉलला भेट देऊन महिलांच्या उद्योग, व्यवसाय आणि उपजीविका विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी अकोला जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच महिलांच्या आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.

त्यानंतर सीएमआरसी व्यवस्थापक श्रीमती सोनाली अंबरते यांनी सीएमआरसीच्या कामकाजाचा आढावा सादर केला. तसेच सीएमआरसी इमारतीच्या उभारणीचा प्रवास, केंद्रामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.

यानंतर उपस्थित सीएमआरसी आरजीबी सदस्य व सहयोगिनी ताईंनी आपल्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या आरोग्य व पोषण, परसबाग विकास, विविध प्रशिक्षण कार्यक्रम, महिलांमार्फत चालविण्यात येणारे उद्योग, उपजीविका विकासाचे उपक्रम तसेच महिलांच्या यशोगाथा याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

या प्रसंगी अकोला जिल्ह्यातील महिला बचत गटांनी स्वकौशल्यातून व सामूहिक प्रयत्नांतून तयार केलेल्या विविध उत्पादनांची आकर्षक परडी जिल्हाधिकारी यांना सस्नेह भेट म्हणून प्रदान करण्यात आली. महिलांच्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून साकारलेल्या उत्पादनांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमास सहायक जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती अंभोरे, श्री. प्रविणकुमार कथे, जिल्हा प्रकल्प सल्लागार, अकोला, जिल्ह्यातील सर्व सीएमआरसी व्यवस्थापक, उपजीविका विकास सल्लागार तसेच अकोला लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगिनी ताई उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी यांच्या या भेटीमुळे महिला बचत गट, महिला उद्योजक आणि लोकसंचलित साधन केंद्राच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या वाटचालीला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.

माविम सर्वच क्षेत्रात काम करीत असल्याचे आणि महिलांचा आत्मविश्वास वाढविले असल्याचे समाधान श्रीमती मीना यांनी व्यक्त केले. त्यांनी शिवणी गावातील 43 गटातील 11आशावर्कर झालेल्या काही प्रतिनिधी सोबत प्रत्यक्ष चर्चा केली. दरम्यान महिलांच्या आरोग्यावर च्या काही यशोगाथा महिलांकडून ऐकल्या.तसेच ME लोन घेतलेल्या महिलांसोबत आणि बचत गटातून महिलांनी स्वतःच्या घराचे स्वप्न कश्या पद्धतीने साकारले ते समजून घेतले, गटाला मिळणारे लिंकेज आणि त्यातून असलेले 99 टक्के परतफेड रेशो, जीवमृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत तयार करून शेतात त्याचा वापर कश्या पद्धतीने करीत आहे हे महिलांकडून समजून घेतले. बचत गटापासून तर सेतू चालक, संस्था चालक, आणि पुढील पतसंस्था चालक हा प्रवास इतकेच नाही तर पर्यावरण साठी सुद्धा महिला काम करीत आहे. आणि इतकी सुंदर राज्यातील प्रथम l इमारत तेजस्विनी भवन बघून मा. जिल्हाधिकारी मॅडम यांनी माविमच्या सर्वच कामाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे मा. राजलक्ष्मी शाह व्यवस्थापकीय संचालक माविम यांनी मसुरी येथे आय ए एस प्रशिक्षण केंद्रात सेंटर ला अकोला जिल्ह्याला अनुभव सादरीकरणासाठी अभूतपूर्व संधी दिली.याचा ही उहापोह केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande