
अकोला, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, ३ रोजी अकोला, बुलढाणा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी करणार असून, विविध ठिकाणी नागरिकांची निवेदनेही स्वीकारणार आहेत.
आज, शनिवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता येवता, ता. जि. अकोला येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली जाणार आहे. दुपारी १२.३० वाजता मानकी, ता. बाळापूर, जि. अकोला येथेही पिकांची पाहणी करण्यात येणार आहे.
दुपारी १.३० वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर, शेगाव येथे आगमन व दर्शन होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदने स्वीकारली जातील. सायंकाळी ५.१५ वाजता रणथाम, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथे दुष्काळग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे