
पॅरिस, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।बीएपीएस (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम) स्वामीनारायण संस्थेने गुरुवारी सांगितले की, तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, पॅरिसमधील एफिल टॉवरच्या भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना तेथून हटवण्याची किंवा त्यांना वेगळे ठेवण्याची कोणतीही विनंती संस्थेकडून करण्यात आली नव्हती.
बीएपीएस पॅरिसने सांगितले की, “सुरुवातीपासूनच आम्ही सातत्याने स्पष्ट केले आहे की, महिला कर्मचाऱ्यांना लपवण्याची, तेथून हटवण्याची किंवा त्यांना वेगळे ठेवण्याची कोणतीही विनंती कधीही करण्यात आली नव्हती.”तपासातून हे तथ्य स्पष्ट झाले आहे की, बीएपीएसकडून पर्यटकांच्या मार्गावरील महिला कर्मचाऱ्यांना वेगळे ठेवण्याची कोणतीही विनंती करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान गेल्या महिन्यात या घटनेच्या निषेधार्थ एफिल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. स्वामीनारायण संस्थेशी संबंधित सुमारे १०० जणांच्या भेटीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना तेथून हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या संपामुळे एफिल टॉवर एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode