
चंद्रपूर, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।
पंधरा वर्षाच्या कार्यकाळात गोडवाना विद्यापीठाने स्वतःची चांगली छबी तयार केलेली आहे. या जिल्ह्यात शिक्षणाचे महत्त्व वाढवण्यासाठी या विद्यापीठाची निर्मिती झाली. शिक्षणाच्या विविध क्षेत्रात विद्यापीठाने न्याय दिलेला आहे . त्यामुळे हे विद्यापीठ समाजाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे . गोंडवाना विद्यापीठाचे आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे कार्य गौरवास्पद आहे. शिक्षण आणि कौशल्य यांची सांगड घालून समाजाभिमुख विद्यार्थी घडविणारे विद्यापीठाचे नवोउपक्रम निश्चितच दिशादर्शक आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाचा शाश्वत विकास आणि संतुलित विकास घडविणारे गोंडवाना विद्यापीठ हे नवे मॉडेल म्हणून नावारूपास येईल, अशी आशा गोंडवाना विद्यापीठाच्या 15 व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख अतिथि म्हणून लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, प्र-कुलगुरू श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, लक्ष्मीनारायण विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विशेष अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले , विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेमधून बेस्ट इंजिनियर तयार होत असून त्यांना प्रत्यक्ष उद्योगांसोबत काम करायला मिळत आहे. एक जिल्हा पुढे जाण्यासाठी समाजातील सर्व घटक जबाबदार असतात. त्यामुळे कौशल्ययुक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण ,
मजबूत अर्थव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांच्या माध्यमातून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल. असे ते म्हणाले .
अध्यक्ष स्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, समाजाप्रती या विद्यापीठाचे उत्तरदायित्व आहे . समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचून जिल्ह्यातील समस्यांना समाधान देण्याचं काम हे विद्यापीठ करत आहे.
स्पर्धा परीक्षा केंद्र, स्पार्क, स्कूल कनेक्ट अशा किती तरी उपक्रमातून विद्यार्थी समाजाशी जोडलेले आहे. आणि जीवन शिक्षण घेत आहे त्यामुळे समस्या नंतर समाधान देण्याचं काम. हे विद्यापीठ करत आहे.
विद्यापीठ पुरस्कार – २०२६ पुरस्कारासाठी निवड केलेली नावे
१ उत्कृष्ट नॅशनल अचिव्हर्स पुरस्कार डॉ. एस. बी. किशोर, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
२ उत्कृष्ट अधिसभा सदस्य पुरस्कार डॉ. शीला नरवाडे, चिंतामणी महाविद्यालय, पोंभुर्णा
३ उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार महात्मा गांधी विज्ञान महा. गडचांदूर, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ
४ उत्कृष्ट शारीरिक शिक्षण निर्देशक पुरस्कार डॉ. कुलदीप राजकिशोर गौड, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर
५ उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार डॉ. रामदास राजाराम कामडी, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा
६ पद्मश्री एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. मोहन शशिकांत एथकंठीवार, यादवऱाव पोशेट्टीवार कला महाविद्यालय, तळोधी (बाळापूर)
७ उत्कृष्ट विद्यापीठ अधिकारी वर्ग–२ पुरस्कार श्री. कृष्णा देविकर, असिस्टंट प्रोग्रामर , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
८ उत्कृष्ट विद्यापीठ कर्मचारी वर्ग–३ पुरस्कार श्री. शैलेश येसेंकर, निम्न श्रेणी लिपिक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
९ उत्कृष्ट महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग–४ पुरस्कार श्री. संजय लहामू बूराडे, मोहसीनभाई जठेरी महाविद्यालय, देसाईगंज, वडसा
१० उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार श्री. मयूर प्रमोद बुरांडे, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव