पनवेल: बनावट नंबर लावून विनयभंग करणारा थार चालक अटकेत
रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। लाल रंगाच्या थार जीपवर बनावट नंबर प्लेट लावून तरुणीचा विनयभंग आणि अपघात घडवून आणणाऱ्या सराईत आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-३, पनवेल) च्या पथकाने अवघ्या १० तासांत बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेज व आरटीओ नोंदींच्या
lala


रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। लाल रंगाच्या थार जीपवर बनावट नंबर प्लेट लावून तरुणीचा विनयभंग आणि अपघात घडवून आणणाऱ्या सराईत आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखा (कक्ष-३, पनवेल) च्या पथकाने अवघ्या १० तासांत बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेज व आरटीओ नोंदींच्या तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपीचा खरा माग काढला.

खारघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. सीसीटीव्हीत थारचा क्रमांक MH 43 AR 6335 असा आढळला; मात्र आरटीओ पडताळणीत हा क्रमांक मारुती वॅगन-आरचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा बनावट क्रमांक वापरण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतील लाल रंगाच्या नोंदणीकृत तब्बल ६२ थार वाहनांची सखोल तपासणी केली. त्यातून या थारचा मूळ क्रमांक MH 20 FU 3751 असल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बोनकोडे (कोपरखैरणे) येथून आरोपी अली उर्फ तालिब अहसन नखवी (वय ३०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध यापूर्वीही नेरूळ ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध खारघर ठाण्यात अपघाताचाही नवा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande