चौक फाटा येथे गुटखा विक्रीप्रकरणी खालापूर पोलिसांकडून तिघांना अटक
रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौक फाटा येथे बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याचा बेकायदेशीर साठा करून विक्री करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध विक्रेत्या
खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौक फाटा येथे बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याचा बेकायदेशीर साठा करून विक्री करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मौजे चौक फाटा येथील 'श्री पान शॉप' या दुकानावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. नागरिकांच्या, विशेषतः तरुणांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या सुगंधित पानमसाला आणि गुटख्यावर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण बंदी घातलेली आहे. असे असतानाही नफेखोरीसाठी या दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मालाचा साठा करून त्याची गुप्तपणे विक्री केली जात असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले.  पोलिसांनी घटनास्थळावरून संपूर्ण बेकायदेशीर साठा जप्त करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचा मुख्य पुरवठादार कोण आहे, याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंगटे करत आहेत.


रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौक फाटा येथे बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटख्याचा बेकायदेशीर साठा करून विक्री करणाऱ्या तिघांना खालापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चौक फाटा येथील 'श्री पान शॉप' या दुकानावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. नागरिकांच्या, विशेषतः तरुणांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या सुगंधित पानमसाला आणि गुटख्यावर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण बंदी घातलेली आहे. असे असतानाही नफेखोरीसाठी या दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मालाचा साठा करून त्याची गुप्तपणे विक्री केली जात असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून संपूर्ण बेकायदेशीर साठा जप्त करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचा मुख्य पुरवठादार कोण आहे, याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंगटे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande