एशियाई खेळ २०२६: परवीन हुड्डा ने ६५ किलो बॉक्सिंग प्रकारात जिंकले सुवर्णपदक
एशियाई खेळात सुवर्णपदक जिंकणारी तिसरी भारतीय महिला बॉक्सर नागोया (जपान), 02 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताच्या परवीन हुड्डाने शुक्रवारी एशियाई खेळ २०२६ मधील महिला ६५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिनी ताइपेईच्या चेन निएन-चिनचा ३-२ अशा
Sports Boxing Parveen Wins Gold Asian Games


एशियाई खेळात सुवर्णपदक जिंकणारी तिसरी भारतीय महिला बॉक्सर

नागोया (जपान), 02 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताच्या परवीन हुड्डाने शुक्रवारी एशियाई खेळ २०२६ मधील महिला ६५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिनी ताइपेईच्या चेन निएन-चिनचा ३-२ अशा विभाजित निर्णयाने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. यासह परवीन एशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची तिसरी महिला बॉक्सर ठरली आहे. यापूर्वी मेरी कोमने २०१४ मध्ये, तर लवलीना बोरगोहेनने याच स्पर्धेत शुक्रवारी ७५ किलो वजनी गटात ही कामगिरी केली.

अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. दोन्ही बॉक्सरनी पहिल्या फेरीत सावध सुरुवात केली आणि सुरुवातीच्या क्षणी आक्रमक होणे टाळले. रेफरीने इशारा दिल्यानंतर परवीनने निर्णायक प्रहार करत पाचही पंचांकडून १०-९ असे गुण मिळवले. पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या चेन निएन-चिनने दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन केले. आक्रमक पद्धतीने खेळताना तिने पाचही पंचांकडून १०-९ असे गुण मिळवत सामना बरोबरीत आणला.निर्णायक तिसऱ्या फेरीत परवीनने दबावाच्या परिस्थितीत संयम कायम ठेवला आणि ३-२ अशा विभाजित निर्णयाने सामना आपल्या नावावर केला. २०२६ च्या एशियाई खेळांमध्ये महिला ६५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग ही नवी वजन श्रेणी आहे. परवीनने या गटातील पहिले एशियाई खेळांचे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

रोहतक येथील परवीनचा जन्म १५ एप्रिल २००० रोजी झाला. ती रोहतक येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षण घेते आणि टॉप्स विकास कार्यक्रमाशी जोडलेली आहे. तिने २०२२ च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, तर त्याच वर्षी एशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०२५ च्या जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीतही तिने सुवर्णपदक पटकावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande