बीड येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
बीड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ‘आमदार विजयसिंह पंडित चषक’ राज्यस्तरीय ११-साईड फुटबॉल स्पर्धेचा आज उत्साहात शुभारंभ झाला. ग्रीन स्टार आणि मिलन बॉईज स्पोर्टिंग क्लब यांच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धे
फुटबॉल स्पर्धा


बीड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे ‘आमदार विजयसिंह पंडित चषक’ राज्यस्तरीय ११-साईड फुटबॉल स्पर्धेचा आज उत्साहात शुभारंभ झाला.

ग्रीन स्टार आणि मिलन बॉईज स्पोर्टिंग क्लब यांच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेत कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पुसद, भुसावळ, अमरावती आदी ठिकाणांहून नामांकित फुटबॉल संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस बीडकर क्रीडाप्रेमींना दर्जेदार आणि चुरशीच्या फुटबॉल सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

बीड जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळावे, स्थानिक खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. स्पर्धेत सहभागी सर्व संघ व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले.

याप्रसंगी संपादक श्री. मुजीबभाई शेख, नगरसेवक श्री. अश्फाक इनामदार, नगरसेवक श्री. जयतुल्ला खान, नगरसेवक श्री. जकी सौदागर, नगरसेवक श्री. महेश धांडे, नगरसेवक श्री. बिलाल शेख, श्री. जमिलोद्दीन साहब, श्री. अरुणभाऊ चौरे, श्री. मुबिस खलीलोद्दीन, अखिल सर, वकील सर यांच्यासह आयोजक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande