


अमरावती, 02 ऑक्टोबर (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ शुक्रवारी (2 ऑक्टोबर) पहाटे समृद्धी महामार्गावर ट्रक आणि टेम्पो-पिकपमध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तब्बल 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये 18 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक 97 जवळ हा अपघात झाला आहे. मृतांमधील सर्वजण सोमनाथ लेआउट सिंधी मेघे येथील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, 20 ते 25 जण नवरात्रौत्सवासाठी शेगाववरून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याला जात होते.
शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्धा येथे जात असलेल्या बोलेरो पिकअप वाहनास (MH-05-BH-5793) मागून येणाऱ्या ट्रक क्र. CG-07-CJ-8855 ने धडक दिली.
वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील सार्वजनिक दुर्गा पूजा उत्सव समितीचे 25 ते 30 कार्यकर्ते टेम्पो – पिकअप वाहनाने शेगाववरून दुर्गा माता मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतत होते. मध्यरात्री 1 ते पहाटेच्या सुमारास त्यांच्या वाहनाला एका ट्रकने पाठीमागून भीषण धडक दिली. याची भीषणता इतकी होती की, वाहनाचा चक्काचूर झाला आणि काही कार्यकर्ते थेट महामार्गाच्या बाजूला फेकले गेले. अपघातातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील गंभीर उपचारांसाठी वर्ध्याच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मंगरूळ दस्तगीर पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, धामणगाव नगराध्यक्ष अर्चना रोठे रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णाची विचारपूस केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.
ही सर्व तरुण मंडळी २८ तारखेस शेगावला पोहचली होती. बोलेरो पिकअप वाहनाने ३० सप्टेंबर रोजी त्यांचा मूर्तीसह परतीचा प्रवास सूरू झाला. मूर्ती असल्याने वाहन अत्यंत संथ गतीने निघाले होते. अवघी ५ची स्पीड असल्याचे या दुःखद प्रवासातून सुखरूप वाचलेले व सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवम राऊत यांनी लोकसत्तास सांगितले. गावाजवळ पोहचत असतांनाच १२ चाकी अजस्त्र ट्रक या गाडीला वेगात येऊन धडकला. महामार्गाच्या अगदी एका बाजूला आमचे वाहन जात असतांना आमची काहीच चूक नव्हती. मात्र ट्रक धडकला आणि होत्याचे नव्हते झाले, असे रडवेल्या स्वरात राऊत सांगतो.
ही सर्व तरुण मंडळी २८ तारखेस शेगावला पोहचली होती. बोलेरो पिकअप वाहनाने ३० सप्टेंबर रोजी त्यांचा मूर्तीसह परतीचा प्रवास सूरू झाला. मूर्ती असल्याने वाहन अत्यंत संथ गतीने निघाले होते. अवघी ५ची स्पीड असल्याचे या दुःखद प्रवासातून सुखरूप वाचलेले व सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवम राऊत यांनी लोकसत्तास सांगितले. गावाजवळ पोहचत असतांनाच १२ चाकी अजस्त्र ट्रक या गाडीला वेगात येऊन धडकला. महामार्गाच्या अगदी एका बाजूला आमचे वाहन जात असतांना आमची काहीच चूक नव्हती. मात्र ट्रक धडकला आणि होत्याचे नव्हते झाले, असे रडवेल्या स्वरात राऊत सांगतो.
या दुर्गा मंडळाचे हे ८ वे वर्ष आहे. गत ५ वर्षांपासून ही मंडळी समृद्धी मार्गानेच मूर्ती घेऊन येत असतात. मूर्ती सोबत असल्याने डोळ्यात तेल घालून व दक्ष राहून प्रवास केल्या जातो. यावेळी १४ फूट उंचीची दुर्गामाता मूर्ती सोबत होती. सर्व ती काळजी घेऊन कंटाळवाना म्हणता येईल असा हा प्रवास भक्तिमय भावनेत सूरू. पण काळ गावाजवळ येऊन वाट बघत आहे, अशी सूतराम शंका कोणास आली नाही. सर्व २० ते २५ या वयोगटातील व विविध व्यवसाय करणारे. या मंडळाचा उत्सव भव्य मूर्ती व विविध उपक्रम असल्याने शहरात लोकप्रिय म्हटल्या जातो.
मृतक व जखमींचे नावे
या भीषण अपघातात ७ मृत झाले. घनश्याम पाटील, प्रवीण बकाने, गोलू बादलगवार, ओम गावंडे, दत्ताजी खुरसागे, रोशन राऊत व मुनेश्वर ढोले असे मृत व्यक्ती आहेत. तर दिनेश पांडुरंग नानवटे, सागर मुनेश्वर ढोले, प्रतीक रामदास सिरस्कार, दुर्गेश यशवंत भिसे, अनिल मारोती मसराम, प्रणय प्रभाकर ढोले, यश रवींद्र मलकापूरे, सतीश खाडे, सतीश वसंत राऊत, पवन मोरेश्वर ढोले, नंदकिशोर देविदास सिरस्कार, नरेंद्र प्रल्हाद सोयाम, नयन सुधीर खानझोड, शिवम विकास राऊत, दिनेश रामकृष्ण पोहणकर, अमित शंकरराव ठाकरे, अमित आडे व आर्यन वैद्य हे जखमी आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे सुशांत वानखेडे यांनी दिली. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एकास नागपूरला पाठविण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी