निर्यातीत उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.) - केंद्रीय वाणिज्य विभागाने, अधिसूचना क्रमांक 41/2026-27, दिनांक 30 सप्टेंबर 2026 द्वारे, निर्यातीत उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी (RoDTEP) योजनेला, 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही योजना देशांतर्गत शुल
निर्यातीत उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर (हिं.स.) -

केंद्रीय वाणिज्य विभागाने, अधिसूचना क्रमांक 41/2026-27, दिनांक 30 सप्टेंबर 2026 द्वारे, निर्यातीत उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी (RoDTEP) योजनेला, 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही योजना देशांतर्गत शुल्क प्रदेश (DTAs) युनिट्स, अग्रिम प्राधिकरण (AA) धारक, विशेष आर्थिक क्षेत्र युनिट्स आणि निर्याताभिमुख युनिट्स (EOUs) यांनी केलेल्या निर्यातीसाठी उपलब्ध असेल.

या योजनेअंतर्गत, निर्यात केलेल्या उत्पादनांवर लागणारी, परतावा न मिळालेली अशी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील शुल्के, कर आणि उपकर यांचा परतावा दिला जातो. यामध्ये आधीच्या टप्प्यांवर भरलेल्या एकत्रित अप्रत्यक्ष करांचाही समावेश होतो.

सध्या या योजनेअंतर्गत असलेले दर आणि मूल्याची मर्यादा, जी परिशिष्ट 4Rमध्ये आणि परिशिष्ट 4RE मध्ये अधिसूचित करण्यात आली आहे, ती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत लागू होती, आता मुदतवाढीनंतर ती देखील, वर दिलेल्या कालावधीपर्यंत लागू राहणार आहे.

या उपाययोजनांमुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांमधे भारतीय निर्यातदारांना समान संधी आणि पाठबळ मिळण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande