छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याच्या आयोजनासाठी नियोजन बैठक
छत्रपती संभाजीनगर, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्याचा, अतुलनीय पराक्रमाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या भव्य ऐतिहासिक महानाट्याच
ण


छत्रपती संभाजीनगर, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय शौर्याचा, अतुलनीय पराक्रमाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या भव्य ऐतिहासिक महानाट्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे नियोजन बैठक संपन्न झाली.

या बैठकीत महानाट्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आयोजनासंदर्भातील नियोजन, पूर्वतयारी आणि विविध व्यवस्थांचा आढावा घेऊन उपस्थितांनी विचारविनिमय केला.

या बैठकीस भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महानाट्याचे आयोजक राजेंद्र साबळे, माजी महापौर बापू घडामोडे, कचरू घोडके आणि हर्षवर्धन कराड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या दृष्टीने ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ हे महानाट्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महानाट्याच्या आयोजनासाठी उपस्थित मान्यवरांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करून नियोजन प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande