
छत्रपती संभाजीनगर, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित पोलीस स्मृती दिन कार्यक्रमास उपस्थित राहून कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना श्रद्धांजली अर्पण केली.
देशाची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांचे संरक्षण करणे या कर्तव्यांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलिसांच्या बलिदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. मंत्री अतुल सावे यांनी शहीद पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या शौर्याला, त्यागाला आणि कर्तव्यनिष्ठेला विनम्र अभिवादन केले.
देशाच्या सेवेसाठी प्राणांची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या सर्वोच्च बलिदानातून समाजाला कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि देशसेवेची प्रेरणा मिळत राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis