परभणी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव 24 ऑक्टोबरला
सहसरकार्यवाह आलोक कुमार राहणार उपस्थित परभणी, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेनुसार माधव नगराच्या वतीने शनिवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील मारुती मंदिरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्
परभणी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव 24 ऑक्टोबरला


सहसरकार्यवाह आलोक कुमार राहणार उपस्थित

परभणी, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेनुसार माधव नगराच्या वतीने शनिवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील मारुती मंदिरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह आलोक कुमार प्रमुख वक्ते म्हणून, तर उद्योजक अविनाश जयप्रकाश बिहाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता, शिस्त, संघटनभावना आणि समाजाप्रती कर्तव्यभावनेचा संदेश दिला जातो. समाजात राष्ट्रीय विचारांची जागृती व्हावी आणि राष्ट्रकार्याप्रती नागरिकांची बांधिलकी अधिक दृढ व्हावी, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. शहरातील नागरिकांनी या विजयादशमी उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर कार्यवाह अजय हमदापूरकर यांनी केले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande