
कोमो (इटली), 22 ऑक्टोबर (हिं.स.) यूईएफए चॅम्पियन्स लीग २०२६-२७ च्या तिसऱ्या सामन्यात, कोमोने मँचेस्टर युनायटेडवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. 'स्टेडिओ ज्युसेप्पे सिनिगाग्लिया' येथे झालेल्या या सामन्यात अर्जेंटाईन मिडफिल्डर निको पाझने दोन गोल करत आपल्या संघाला हा संस्मरणीय विजय मिळवून दिला.
सेस फॅब्रेगास यांच्या मार्गदर्शनाखालील कोमोने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला आघाडी घेतली. निको पाझने मिडफिल्डवर मिळालेल्या संधीचा फायदा घेत डाव्या पायाने चेंडू थेट जाळीत धाडला.मचेस्टर युनायटेडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पम कोमोच्या शिस्तबद्ध बचावपटूंनी त्यांना कोणतीही मोठी संधी दिली नाही, ज्यामुळे मध्यंतरापर्यंत युनायटेडला बरोबरी साधता आली नाही.
दुसऱ्या सत्राच्या चौथ्या मिनिटाला (४९ व्या मिनिटाला) तासॉस डौविकासाने उजव्या बाजूने रचलेल्या वेगवान आक्रमणाचे रूपांतर गोलमध्ये केले आणि कोमोची आघाडी २-० अशी वाढवली.यानंतर ५७ व्या मिनिटाला निको पाझने पुन्हा एकदा गोल करत आपली वैयक्तिक गोलसंख्या दोनवर नेली. एका वेगवान प्रति-आक्रमणादरम्यान ,पेनल्टी एरियाच्या सीमेवरून त्याने अतिशय संयमाने चेंडू गोलजाळीत मारला, ज्यामुळे कोमोची पकड अधिक मजबूत झाली.
मँचेस्टर युनायटेडला कोमोच्या आक्रमणांचा सामना करताना संघर्ष करावा लागला आणि ७५ व्या मिनिटाला इटालियन संघाने चौथा गोल नोंदवला. जॅकोबो रामोनने कॉर्नर किकवर मिळालेल्या चेंडूला हेडरद्वारे गोलमध्ये रूपांतरित केले. सामन्याच्या स्टॉपेज टाइममध्ये बदली फुटबॉलपटू जोशुआ झिर्कझीने अमाद डियालोच्या क्रॉसवर गोल करत युनायटेडसाठी एक गोल परत केला. मात्र, या उशिरा आलेल्या गोलचा निकालावर कोणताही परिणाम झाला नाही आणि कोमोने एक मोठा विजय साजरा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे