तिबेटमध्ये 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
सध्या जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती नाही ल्हासा, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : तिबेटमध्ये गुरुवारी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार 8 वाजून 3 मिनिटांनी 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र
प्रतिकात्मक लोगो


सध्या जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती नाही

ल्हासा, 22 ऑक्टोबर (हिं.स.) : तिबेटमध्ये गुरुवारी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार 8 वाजून 3 मिनिटांनी 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे 173 किलोमीटर खोलीवर होता.भूकंपाचे धक्के दूरवर जाणवले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत जीवितहानी किंवा मालमत्तेच्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वी नेपाळमध्येही 8 सप्टेंबर रोजी भूकंपाची नोंद झाली होती. दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात झालेल्या हिमस्खलन आणि पुराच्या आपत्तीनंतर या परिसरात मदत व बचावकार्य सुरू असल्याचे वृत्त आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अनेक लोक बेपत्ता झाल्याचेही सांगण्यात आले होते. दरम्यान, जागतिक तापमानवाढीमुळे किंघाई-तिबेट पठारावरील हिमनद्या वेगाने वितळत असल्याचा इशारा तज्ज्ञ आणि चिनी संशोधकांनी दिला आहे.

हिमनद्या वितळण्याच्या प्रक्रियेमुळे या संवेदनशील प्रदेशात भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.किंघाई-तिबेट पठार हे ब्रह्मपुत्रासह अनेक प्रमुख नद्यांचे उगमस्थान आहे. या नद्या अनेक देशांतून वाहत असल्याने या प्रदेशातील पर्यावरणीय बदलांचा परिणाम नदीखोऱ्यातील आणि सखल भागांतील लोकजीवनावर होऊ शकतो. त्यामुळे हिमनद्या, हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींच्या संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande