छ.संभाजीनगर - रब्बी हंगामात ज्वारीच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी ज्वारीच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी व पशुपालकांनी चारा उत्पाद
छ.संभाजीनगर - रब्बी हंगामात ज्वारीच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप


छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून रब्बी हंगामात चारा उत्पादनासाठी ज्वारीच्या बियाण्यांचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी व पशुपालकांनी चारा उत्पादन वाढवावे आणि आगामी काळातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी संतोष वाघमारे व शिवानंद सूर्यवंशी (कोटीतीर्थ), बालाजी श्रीसागर (बोरगाव), दत्ता शिंदे (डोनवाडा), दिनकर भोसले (वाघी) आणि नामदेव येवले (मार्कंड) या दूध उत्पादक पशुपालकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संवर्धन, चारा व्यवस्थापन आणि दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून थेट संवाद व समन्वयाला प्राधान्य देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande