Joyalukkas मुलुंड शोरूममध्ये ‘ब्रिलियन्स डायमंड ज्वेलरी शो’चे आयोजन
मुंबई, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला आघाडीचा ज्वेलरी ब्रँड Joyalukkas यांच्या मुलुंड येथील शोरूममध्ये आज, २३ ऑक्टोबरपासून ‘ब्रिलियन्स डायमंड ज्वेलरी शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रदर्शनात हिऱ्यांच्या दागिन्यांमधील उ
Joyalukkas मुलुंड शोरूम ब्रिलियन्स डायमंड ज्वेलरी शो


मुंबई, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला आघाडीचा ज्वेलरी ब्रँड Joyalukkas यांच्या मुलुंड येथील शोरूममध्ये आज, २३ ऑक्टोबरपासून ‘ब्रिलियन्स डायमंड ज्वेलरी शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रदर्शनात हिऱ्यांच्या दागिन्यांमधील उत्कृष्ट कलाकुसर, आकर्षक डिझाइन्स आणि आधुनिक शैलीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

या प्रदर्शनात लग्नसमारंभांसाठी खास तयार केलेले आकर्षक डायमंड सेट्स तसेच दैनंदिन वापरासाठी उपयुक्त असलेल्या आधुनिक आणि स्टायलिश दागिन्यांचा समावेश आहे. पारंपरिक सौंदर्य आणि समकालीन डिझाइन यांचा सुरेख मेळ साधणारे हे दागिने ग्राहकांना मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतील.

Joyalukkas समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जॉय अलुक्कास म्हणाले, “ब्रिलियन्स डायमंड ज्वेलरी शो हा हिऱ्यांच्या चिरंतन सौंदर्याला आणि दागिन्यांच्या डिझाइनमधील परिपूर्णतेप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीला समर्पित आहे. मुलुंड हे आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सणासुदीच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना सौंदर्य, वैयक्तिक आवड आणि उत्कृष्ट कलाकुसर यांचा मिलाफ असलेल्या खास डायमंड डिझाइन्स पाहण्याची आणि निवडण्याची विशेष संधी मिळणार आहे.”

या प्रदर्शनानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. प्रदर्शनाच्या कालावधीत १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे हिऱ्यांचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक सोन्याचे नाणे मोफत देण्यात येणार आहे.

‘ब्रिलियन्स डायमंड ज्वेलरी शो’चे आयोजन मुलुंड येथील जॉयअलुक्कास शोरूममध्ये ८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. हिऱ्यांच्या आकर्षक दागिन्यांचे वैविध्यपूर्ण संग्रह पाहण्यासाठी आणि सणासुदीच्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande