अल्ट्राव्हायोलेटची एक्स-४७ व्हेनम इलेक्ट्रिक बाइक लाँच
बंगळुरू, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्माता कंपनी अल्ट्राव्हायोलेटने भारतात आपली नवी एक्स-४७ व्हेनम इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २.६५ लाख रुपये ठेवण्यात आली असून, ही विशेष किंमत पहि
Ultraviolette Launches X-47 Venom Electric Bike


बंगळुरू, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्माता कंपनी अल्ट्राव्हायोलेटने भारतात आपली नवी एक्स-४७ व्हेनम इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २.६५ लाख रुपये ठेवण्यात आली असून, ही विशेष किंमत पहिल्या पाच हजार ग्राहकांसाठी लागू असेल.

अल्ट्राव्हायोलेट एक्स-४७ व्हेनम ही कंपनीच्या नव्या व्हीएक्स-१०० या १०० व्होल्ट प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली पहिली मोटरसायकल आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर कंपनी भविष्यातील उत्पादनांसाठीही करणार आहे. या बाइकच्या व्हेनम व्हेरिएंटची किंमत २.६५ लाख रुपये, व्हेनम प्लसची ३.१५ लाख रुपये, एक्स-४७ रिकॉनची ३.७५ लाख रुपये आणि व्हेनम रिकॉन प्लसची किंमत ३.९९ लाख ९०० रुपये आहे.

या इलेक्ट्रिक बाइकच्या ११ किलोवॅट-अवर बॅटरी व्हेरिएंटमध्ये आयडीसी प्रमाणित ३४३ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. तर ७.५ किलोवॅट-अवर बॅटरी व्हेरिएंटची रेंज २२७ किलोमीटर आहे. बाइकची इलेक्ट्रिक मोटर ३० किलोवॅट म्हणजेच सुमारे ४० बीएचपी पॉवर आणि ५५० एनएम टॉर्क निर्माण करते. तिचा कमाल वेग ताशी १५५ किलोमीटर असून, अवघ्या ५.९ सेकंदांत ती शून्य ते ताशी १०० किलोमीटर वेग गाठू शकते. बाइकचे वजन १८० किलो असून, मागील जनरेशनच्या तुलनेत ती २० किलोपर्यंत हलकी आहे.

बॅटरी पॅकचे वजन १५ टक्क्यांनी कमी करण्यात आले असून, एनर्जी डेन्सिटी २५ टक्क्यांनी वाढल्याचा कंपनीचा दावा आहे. बाइकची बॅटरी १२ किलोवॅटपर्यंतच्या डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षिततेसाठी बॅटरीमध्ये आयपी६७ रेटिंग, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम आणि विशेष पायरो-फ्यूज देण्यात आला आहे.

या बाइकचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ७७ गिगाहर्ट्झ रिअर रडार. हा रडार २०० मीटरपर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवतो. ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन बदलण्यास मदत, ओव्हरटेक अलर्ट आणि मागून होणाऱ्या धडकेचा इशारा यांसारखी वैशिष्ट्ये यात आहेत. याशिवाय सात इंचांची टचस्क्रीन, मॅपल्स नेव्हिगेशन, रिअर कॅमेरा पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि व्हायोलेट एआय अलर्ट मिळतात.

ही बाइक आफ्टरबर्नर यलो, टर्बो रेड, कॉस्मिक ब्लॅक आणि स्टेलर व्हाइट अशा चार रंगांत उपलब्ध होणार आहे. कंपनीने पुनर्वापर करता येणाऱ्या बी-मॅक्स सेफ्टी जॅकेटचीही घोषणा केली आहे. हे जॅकेट ८६ टक्क्यांपर्यंत आघात कमी करू शकते आणि पाच वेळा वापरता येऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande