भाजपकडून मलाही अनेकदा ऑफर, सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.) - मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आली आहे. मला देख
सुशीलकुमार शिंदे


सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.) - मला आणि प्रणिती शिंदेला दोन वेळा भाजपाची ऑफर मिळाली असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आली आहे. मला देखील अनेकवेळा इकडे (भाजपमध्ये) या असं म्हटलं गेलं. मात्र, मी म्हटलं मी तिकडे (काँग्रेस) आहे तर इकडं (भाजप) मध्ये येऊन परत काय करणार, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

परवा बातमी आली माझ्या नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. एक दिवस असं केल्याने काय बिघडलं, मी सुद्धा नुकताच पंतप्रधानांना भेटलो असे शिंदे म्हणाले. यामुळं काहीही बिघडत नाही आणि आपली फिलोसोफी बदलत नाही. मला देखील अनेकवेळा इकडे (भाजपमध्ये) या असं म्हटलं गेलं मात्र मी म्हटलं मी तिकडे (काँग्रेस) आहे तर इकडं (भाजपमध्ये ) येऊन परत काय करणार असे शिंदे म्हणाले. मी जिथे आहे (काँग्रेसमध्ये) तिथलच काम करणार आहे. इकडं (भाजपमध्ये) येऊन परत तुमच्यात ढवळाढवळ नको असेही शिंदे म्हणाले.

भाजपमध्ये आलेल्या नवीन माणसांचे काय हाल होतात हे सुद्धा मी बघितलेलं आहे. 25 वर्षांपूर्वी सुद्धा असच होत होते. त्यावेळी एकत्रित सगळेच पक्ष सोडून गेले पुन्हा 4 ते 5 वर्षात गेलेले सगळे परतले. राजकारणात देखील चुका होत असतात त्यामुळे पत्रकारांनी त्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे, असेही सुशीलकुमार शिंदे म्हणाले. नकळत एखाद्याकडून जर चूक झाली असेल तर ती समजून घेतली आहे, आपली लोकशाही ही वर चढत जाणारी आहे, त्याला काळिमा लागता कामा नये असे शिंदे म्हणाले.

देशाचे पंतप्रधान हे जितकं माझ्याशी बोलतात तितकंच शरद पवारांशीही बोलतात. शरदराव तर त्यांना बारामतीला घेऊन जातात, काय कोणी विचारत नाही. उद्घाटनाला वगैरे गेले तर काही बिघडत नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून (मोदी) होतात, वाईटही घडल्या जातात. मात्र पत्रकारांनी याच विश्लेषण करुन घेतलं पाहिजे. मध्यंतरी संघाचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, मी आवर्जून ते पुस्तक चाळून बघितल्याचे शिंदे म्हणाले. पॉलिटिकलं सायन्सचा विद्यार्थी म्हणून हे सगळं महत्वाचं आहे. काल मार्क्सवादी काम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते सोलापुरात येऊन गेले, त्यांच्याविषयीही मी माहिती घेतली. त्यांचंही साहित्य मी वाचतो. कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास देखील किती मोठा आहे, असे शिंदे म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande