नांदेडमध्ये अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; पीडित महिलेची सुटका
नांदेड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड शहरातील होळी सराफा परिसरातील चंद्रकांत प्लाझा येथे सुरू असल्याची माहिती मिळालेल्या कथित अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी माय-लेकावर गुन्ह
नांदेडमध्ये अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; पीडित महिलेची सुटका


नांदेड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड शहरातील होळी सराफा परिसरातील चंद्रकांत प्लाझा येथे सुरू असल्याची माहिती मिळालेल्या कथित अवैध वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी माय-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रोख रकमेसह एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. होळी सराफा परिसरात हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारवाईत पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, संबंधित महिलेला या व्यवसायात प्रवृत्त केले जात होते का, तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande