
मनिला, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। फिलिपिन्सच्या हवाई तळावर प्रशिक्षणादरम्यान दोन लष्करी विमानांची हवेत टक्कर होऊन चार वैमानिकांचा मृत्यू झाला. हवाई दलाने शनिवारी सांगितले की, मनिलाच्या दक्षिणेकडील फर्नांडो हवाई तळावर एसएफ-२६० (SF-260) हे एक-प्रॉपेलर विमान कोसळले.
फिलिपिन्स हवाई दलाचे प्रवक्ते कर्नल अल्विन कॅपिंगुयन यांनी एका निवेदनात म्हटले आहे, दोन्ही विमाने हवाई तळाच्या हद्दीतच कोसळली. इतर कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. कॅपिंगुयन यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून सर्व एसएफ-२६० (SF-260) विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे.
अलीकडच्या वर्षांत फिलिपिन्सच्या लष्करी विमानांचे अनेक प्राणघातक अपघात झाले आहेत. मे महिन्यात, उत्तर फिलिपिन्सच्या बेंगुएट प्रांतात प्रशिक्षण उड्डाणादरम्यान आणखी एक एसएफ-२६० (SF-260) विमान कोसळले होते, ज्यात दोन लष्करी वैमानिकांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी
२०१७ मध्ये, जेव्हा इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवाद्यांनी दक्षिणेकडील मारावी शहर ताब्यात घेतले, तेव्हा लष्कराने तेथे अनेक महिने हवाई हल्ले करण्यासाठी एसएफ-२६० विमानांचा वापर करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे