
अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। दुष्काळी परिस्थिती, पावसाच्या अनियमिततेमुळेयायावर्षी कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. उत्पादन कमी झाले आणि खुल्या बाजारात कापसाचा दर १० हजार रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोहोचला. यामुळे दिवाळीच्या काळात शेतकऱयांना दिलासा मिळाला असला तरी, जसजसा कापूस घरात येईल, तसे आजचे दरही कमी होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ८ हजार २६७ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ६६७ रुपये हमीभावनिश्चित केला आहे. मात्र, जिल्ह्यात खुल्या बाजारात कापसाला प्रतिक्टिल ९ हजार ३५० ते ९ हजार ४५० रुपयांपर्यंतदर मिळत आहे. तूर्त अमरावती जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्र सुरु झाले नाही. हमीभावापेक्षा प्रतिक्टिल सुमारे १,१८३ रुपये अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विकणे फायदेशीर ठरत आहे. मात्र, सध्याचा दर टिकून राहणार की आवक वाढल्यानंतर त्यात घसरण होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
विदर्भातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जिल्ह्यात यंदा कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच दर चांगला मिळत असला, तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातीलततज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील कापूस उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांचीघटहोऊशकते. त्यामुळे बाजारभावातील वाढ आणि प्रत्यक्ष उत्पादनातील घट यांची सांगड घातल्याशिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे चित्र स्पष्ट होणार नाही.
सीसीआयची खरेदी कधी सुरू होणारदरवर्षी कापूस हंगाम सुरू झाल्यानंतर सरकारी खरेदी केंद्रे वेळेत सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना कमी दराने कापूस विकण्याची वेळ येत असे. आता खुल्या बाजारातील दर हमीभावापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. बाजारातील कापसाचादर प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत जाण्याची चर्चा असल्याने शेतकरी सध्या सरकारी केंद्रांकडे वळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, खुल्या बाजारातील दर घसरल्यास सीसीआयच्या खरेदी केंद्रांचा पर्याय शेतकरी स्वीकारू शकतात, त्यामुळे सीसीआय खरेदी केंद्र अमरावती जिल्ह्यात कधी सुरु होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
उत्पादन घट भरून निघणार का? कापसाची वेचणी पूर्ण झाल्यानंतर बाजारातील आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर दर टिकून राहतात की घसरतात, यावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे गणित अवलंबून असेल. त्यामुळे केवळ सुरुवातीच्या बाजारभावावर समाधान न मानता कापसाला योग्य दर मिळण्याबरोबरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि उत्पादनघटीची भरपाई मिळणे ही तितकेचमहत्त्वाचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी