सोलापूर महापालिकेच्यावतीने महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन
सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व आदरयुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांच्या हस्त
Vjj


सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण व आदरयुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयात महापौर श्री. विनायक दादा कोंड्याल यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

महर्षी वाल्मिकी महाराज यांनी रामायणासारख्या महान महाकाव्याच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला सत्य, धर्म, कर्तव्य, त्याग आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे असून, सामाजिक समता, बंधुभाव आणि सदाचाराची शिकवण देतात. त्यांच्या महान विचारांचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी सभागृह नेते नरेंद्र काळे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, बाली मंडेपू, सतीश वैदिकर, शोभाराज पवार, केवल लालबिगी, दशरथ अडकालु, दीपक वाल्मिकी, अभर लालबिगी, अरुण लोणारी, संतोष पाटील, विश्वनाथ प्याटी, रामदास मगर, शिवाजी कोळी, प्रदीप वाल्मिकी, आशिष चिंचोळकर, शाम वाल्मिकी, नितीन सोलंकी, महेश पदभार, विनोद घेचंद, आभार बारस्कर, संदीप परछा, विशाल जंजोटकर, महेश परमवार, हसन शेख आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande