
बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। : महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चिंचपूर परिसरात केलेल्या कारवाईत ४५० लिटर डिझेल, BMW, विनानंबरची स्विफ्टसह चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोविंद पोपट शिरसाट याच्यासह दोघांना अटक करण्यात आली असून, टोळीतील इतरांचा पोलीस शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis