जर्मनीत एका कारने लोकांच्या समूहाला चिरडले; पाच जण जखमी
बर्लिन, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तर जर्मनीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एका कारने जाणूनबुजून लोकांच्या समूहाला धडक दिली. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यूस्टाट आम रूबेनबर्गे येथे एका संशयिताने बीएमडब
जर्मनीत एका कारने लोकांच्या समूहाला चिरडले; पाच जण जखमी


बर्लिन, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तर जर्मनीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एका कारने जाणूनबुजून लोकांच्या समूहाला धडक दिली. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले आहेत.

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यूस्टाट आम रूबेनबर्गे येथे एका संशयिताने बीएमडब्ल्यू कार जाणूनबुजून लोकांच्या समूहावर घातली. या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींना किरकोळ दुखापत झाली असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत.घटनेच्या वेळी पोलिसांचे एक पथक जवळच नियमित वाहतूक तपासणी करत होते. घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान अधिकाऱ्यांनी वाहनाच्या दिशेने गोळीबारही केला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत सहभागी असलेले लोक एकमेकांच्या परिचयाचे होते.पोलिसांनी सांगितले की, कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेल्या असून, त्या अद्याप फरार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande