इराण पुन्हा अणुशक्ती बनण्याच्या तयारीत; अमेरिकी जनरलचा इशारा
वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।इराण पुन्हा एकदा उभारी घेत असून, त्याने आपले अणुकार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उपग्रहांद्वारे टिपलेली छायाचित्रे समोर आली असून, त्यातून इराणमधील संवेदनशील ठिका
इराण पुन्हा अणुशक्ती बनण्याच्या तयारीत; अमेरिकी जनरलचा इशारा


वॉशिंग्टन, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।इराण पुन्हा एकदा उभारी घेत असून, त्याने आपले अणुकार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उपग्रहांद्वारे टिपलेली छायाचित्रे समोर आली असून, त्यातून इराणमधील संवेदनशील ठिकाणी बांधकाम आणि संरक्षणात्मक तटबंदी मजबूत करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या एका जनरलने इशारा दिला आहे.

अमेरिकेचे निवृत्त फोर-स्टार जनरल जॅक कीन यांनी म्हटले आहे की, इराणने आपल्या अण्वस्त्रविषयक महत्त्वाकांक्षा सोडलेल्या नाहीत. तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू असतानाही इराण आपल्या अणुक्षमता पुन्हा विकसित करण्याच्या कामात गुंतला आहे. माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत कीन म्हणाले की, इराणने अणुकार्यक्रम पूर्णपणे सोडून दिलेला नाही. हा कार्यक्रम इराणच्या सत्ताधारी व्यवस्थेच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी इराणच्या सत्ताधारी व्यवस्थेला धोकादायक आणि दुष्ट असेही संबोधले.

उपग्रह छायाचित्रांमधून इराणमधील अनेक अणुसंबंधित ठिकाणी हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये नतांझ अणुकेंद्राजवळील ‘पिकॅक्स माउंटन’ या संकुलाचाही समावेश आहे. या ठिकाणी असलेली भूमिगत सुविधा जमिनीच्या पृष्ठभागापासून ३०० फुटांपेक्षा अधिक खोलीवर असल्याचे मानले जाते. इराणच्या अणू पायाभूत सुविधांबाबत चिंता वाढलेल्या असताना हे ठिकाण विशेष संवेदनशील लक्ष्य मानले जात आहे.

वृत्तानुसार, इराण अणुकेंद्रे आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित बंकरच्या आसपासची सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करत आहे.वृत्तानुसार, आपल्या शस्त्रांमुळे विरोधकांना निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव असल्याने तेहरानने अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासालाही वेग देण्याचे ठरवले आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या उपग्रह छायाचित्रांमधून इराणमधील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या हालचालींची माहिती समोर आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande