नाशिक - भरारी पथकाच्या कारवाईत सोमेश्वर कॉलनीत ५० लाखांची वीजचोरी उघडकीस
नाशिक, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोमेश्वर कॉलनी परिसरात वीज वितरण कंपनीच्या वाशी येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत दोन ठिकाणी ५० लाख रुपयांची वीजचोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसां
नाशिक - भरारी पथकाच्या कारवाईत सोमेश्वर कॉलनीत ५० लाखांची वीजचोरी उघडकीस


नाशिक, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोमेश्वर कॉलनी परिसरात वीज वितरण कंपनीच्या वाशी येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत दोन ठिकाणी ५० लाख रुपयांची वीजचोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वीज वितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता कंपनीचे वाशी येथील भरारी पथक सुशीलकुमार जयस्वाल, सहाय्यक अभियंता कपिल गाठले यांच्यासह कनिष्ठ अभियंता प्रशांत कराळे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील यांना वरिष्ठ कार्यालयातून मिळालेल्या आदेशानुसार विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत पाहणी करण्यात आली. त्यादरम्यान सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा येथे गीता मॅन्युफॅक्चरिंग अॅण्ड फॅब्रिकेशन येथे वीज जोडणीची तपासणी केली असता या ठिकाणी प्लास्टिक मोल्डिंग करून ट्रॉली ट्रॅव्हल बॅगला लागणारे साहित्य तयार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी कंपनीमध्ये अॅडमिनपदावर असलेले राहुल सारंग पगारे हे तेथे होते. कंपनीची जागा आरोपी अविनाश पांडुरंग काळे यांनी सागर विकास तिडके यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतली असल्याचे सांगितले.

या ठिकाणी कंपनीमालक व जागामालक यांना बोलावले. या कंपनीचे वीज मीटर बॉक्स जमिनीपासून पाच फूट उंचीवर बसविल्याचे आढळले. या मीटरमधून एकाच प्रिमायसेसमध्ये छट एंटरप्रायजेस व अविनाश पांडुरंग काळे यांच्या मालकीची असलेली संस्कृती एंटरप्रायजेस या दोन कंपन्यांना वीजपुरवठा होत असल्याचे दिसून आले. वीज मीटर संशयास्पद असल्याचे भरारी पथकाला आढळून आले. आरोपी गीता विकास तिडके व अविनाश पांडुरंग काळे यांनी दि. १ ऑक्टोबर २०२५ पासून ते २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुमारे ५० लाख ३० हजार ३९० रुपयांची वीजचोरी करून वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी तिडके व काळे यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागलोट करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande