
बीड, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : माजलगाव शहरात कत्तलीसाठी गोवंश जनावरांची क्रूरपणे वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. माजलगाव शहर पोलिसांनी छत्रपती संभाजी महाराज चौकात सापळा रचून १६ गोवंश जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला आहे. या कारवाईत टेम्पोसह १६ जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis