जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या आद्या बाहेतीला कांस्यपदक
15 पैकी 13 सामने जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी; शहराच्या क्रीडाक्षेत्राचा गौरव परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। इंग्लंडमधील शेफिल्ड शहरात झालेल्या 11 वर्षांखालील ‘जागतिक ऑलिंपिक’ स्पर्धेत परभणीच्या आद्या महेश बाहेती हिने मु
भ


15 पैकी 13 सामने जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी; शहराच्या क्रीडाक्षेत्राचा गौरव

परभणी, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। इंग्लंडमधील शेफिल्ड शहरात झालेल्या 11 वर्षांखालील ‘जागतिक ऑलिंपिक’ स्पर्धेत परभणीच्या आद्या महेश बाहेती हिने मुलींच्या गटात कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत आद्याने एकूण 15 सामने खेळताना 13 सामन्यांत विजय मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत पाच खंडांतील विविध देशांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इजिप्त, इंग्लंड, फिनलंड, ग्रीस, ग्वातेमाला, भारत, मलेशिया, न्यूझीलंड, पराग्वे, पेरू, रोमानिया, ट्युनिशिया, उझबेकिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचे प्रतिनिधित्व करणार्या खेळाडूंमध्ये आद्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. विविध देशांतील खेळाडूंशी झालेल्या सामन्यांत तिने सातत्यपूर्ण कामगिरी करत कांस्यपदकाला गवसणी घातली.

आद्या बाहेती ही भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत परभणी येथे चालणार्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र व मिशन लक्षवेध प्रतिभा विकास केंद्रात प्रशिक्षण घेते. चेतन मुक्तावर आणि सूरज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. तिच्या या यशासाठी अनिल बंदेल, सचिन पुरी, असद अली आणि अजय कांबळे यांचेही मार्गदर्शन लाभले.

आद्याने मिळविलेल्या या यशाबद्दल टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे, सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा संघटनेचे सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, यांनी अभिनंदन केले. सरावासाठी सहकार्य करणारे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि पालकांनीही आद्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande