रत्नागिरी शहरात गांजा विक्री करणाऱ्याला अटक
रत्नागिरी, 29 ऑक्टोबर (हिं.स.) । रत्नागिरी शहरात पोलिसांकडून गस्त सुरू असताना सुमारे १ किलोचा गांजा विक्री करण्यासाठी स्वतःकडे बाळगल्या प्रकरणी एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल रात्री प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गद
गांजा बाळगणाऱ्यासह पोलीस पथक


रत्नागिरी, 29 ऑक्टोबर (हिं.स.) । रत्नागिरी शहरात पोलिसांकडून गस्त सुरू असताना सुमारे १ किलोचा गांजा विक्री करण्यासाठी स्वतःकडे बाळगल्या प्रकरणी एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काल रात्री प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने रत्नागिरी शहर परिसरामध्ये गस्त घालत असताना एमआयडीसीतील नाचणकर चाळीत एनडीपीएस रेकॉर्डवरील आरोपी सूरज परशुराम नंदिवले (वय 24, मूळ रा. पाचवड ता.वाई, जि. सातारा) याच्याकडे 1 किलो 201 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याने तो विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 60 हजार रुपये होती. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande