
परभणी, 29 ऑक्टोबर, (हिं.स.)। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी रिझवान शफीक खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल तटकरे यांच्या स्वाक्षरीने त्यांना मुंबई येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निखिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यालयीन सरचिटणीस अमर पाटील उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक अब्दुल जावेद, मुजाहिद मेमन, शाकेर खान, अजीम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडताना युवकांना संघटित करणे, पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि जनहिताच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्यावर भर देणार आहे, अशी प्रतिक्रिया रिझवान खान यांनी व्यक्त केली. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis